बारामतीमध्ये मविआच्या सुळेंची आघाडी लाखा पार; कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुणे : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणूकीचे पहिल्या फेरीचे कल हाती येत आहेत. राज्यात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे तेराव्या फेरी अखेर एक लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात अटीतटीची लढत आहे. सहाव्या फेरीत सुनेत्रा पवार सर्व मतदारसंघांमध्ये पिछाडीवर असल्याच दिसत आहे. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष सुरु झाला आहे.
हेही वाचा
काँग्रेसच्या भूमिकेनुसार माझी पुढील वाटचाल: विशाल पाटील
नागपूर : नितीन गडकरींची निर्णायक विजयाकडे वाटचाल
ओडिशात भाजपची वाटचाल सत्ता स्थापनेकडे