ओडिशात भाजपची वाटचाल सत्ता स्थापनेकडे
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीबरोबर झालेल्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्णायक आघाडी घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा विधानसभेतील एकुण १४७ जागांपैकी दुपारी 2.30 वाजेपर्यंतच्या मतमोजणीत भाजपने ७६ जागांवर आघाडीवर घेतली आहे. तर राज्यातील सत्ताधारी बिजू जनता दलाचे (बीजेडी) केवळ ५३ जागांवर आघाडीवर आहे.
पटनायक सरकारमधील आठ मंत्री पिछाडीवर
ओडिशा विधानसभा निवडणुकीत नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान बिजू जनता दलाला (बीजेडी) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपने ७६ जागांवर आघाडी घेतली आहे. ताज्या माहितीनुसार मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळातील किमान आठ मंत्री सध्या त्यांच्या विरोधकांच्या मागे आहेत.