निवडणुकीचे निकाल आशादायक : शरद पवार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभेचे निर्णायक कल हाती येत आहेत. साऱ्या देशाचे लक्ष लागून असणाऱ्या बारामतीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे विधान केले.
शरद पवार म्हणाले की, देशपातळीवरील निवडणुकीचे निकाल हे आशादायक आहेत. आमच्या समर्थकांनी घेतलेल्या कष्टाबद्दल त्यांचा आभारी आहे. इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. देशपातळीवरचे चित्र आश्वासक आहे. आमच्या आघाडीची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. यासाठी सर्वांना बोलावले जाईल. ज्यात परिस्थिती पाहून पुढची रणनिती ठरवली जाईल.’