दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई विजयी, केवळ घोषणा बाकी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. ठाकरे गटाचे अनिल देसाई हे ५२ हजार ४३६ मतांनी विजयी झाले आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे पराभूत झाले आहेत. आता अनिल देसाई (Lok Sabha Election) यांच्या विजयाची केवळ घोषणा बाकी आहे.
ठाकरेंची शिवसेना गटाचे अनिल देसाई यांना एकूण ३७८९४८ मते मिळाली आहे. तर पराभूत उमेदवार राहुल शेवाळे यांना ३२६५१२ मते मिळाली (Lok Sabha Election ) आहेत.