उत्तर प्रदेशमध्‍ये ‘सपा’ची सायकल सुसाट, २० हून अधिक जागांवर चुरशीची लढत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या मतमोजणीत देशातील सर्वात मोठे राज्य असणार्‍या उत्तर प्रदेशमध्‍ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पिछाडीवर आहेत. भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री पिछाडीवर पडल्‍याचे चित्र आहे. भाजप आणि समाजवादी पार्टीमध्‍ये यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार 20 हून अधिक जागा अशा आहेत जिथे 10 …
उत्तर प्रदेशमध्‍ये ‘सपा’ची सायकल सुसाट, २० हून अधिक जागांवर चुरशीची लढत


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या मतमोजणीत देशातील सर्वात मोठे राज्य असणार्‍या उत्तर प्रदेशमध्‍ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पिछाडीवर आहेत. भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री पिछाडीवर पडल्‍याचे चित्र आहे. भाजप आणि समाजवादी पार्टीमध्‍ये यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार 20 हून अधिक जागा अशा आहेत जिथे 10 हजारांपेक्षा कमी मतांचा फरक आहे. निवडणूक आयोगाने दुपारपर्यंत उपलब्ध असलेल्या ट्रेंडनुसार उत्तर प्रदेशमध्‍ये 80 लोकसभा मतदारसंघांपैकी समाजवादी पार्टी ३४, काँग्रेस ९ जागांवर तर भाजप 34 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप मित्रपक्ष आरएलडी दोन जागांवर आघाडीवर आहे.
समाजवादी पार्टी आणि भाजपमध्‍ये चुरशीची लढत
सध्या १३ लोकसभा मतदारसंघांमध्‍ये ५ हजार मतांपेक्षा कमी फरक दिसत आहे. येथील पाच मतदारसंघांमध्‍ये ५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचा उमेदवार ५ हजारांपेक्षा कमी मतांनी आघाडी घेतली आहे. उर्वरित सात जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. सध्या 23 लोकसभ मतदारसंघांपैकी १० हजार मतांचा फरक आहे. यामध्ये सपाचे १२ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे दोन उमेदवार १० हजारांपेक्षा कमी मतांनी पुढे आहेत. उर्वरित नऊ जागांवर भाजपचे उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

Go to Source