विधानपरिषद ‘शिक्षक-पदवीधर’साठी भाजपकडून शेलार, दराडे, डावखरे यांना उमेदवारी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात येत्या २६ जून रोजी ४ पदवीधर व शिक्षक मतदारसंघात निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी आपले ३ उमेदवार जाहीर केले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना तर मुंबई विभाग पदवीधरमधून किरण शेलार आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. …

विधानपरिषद ‘शिक्षक-पदवीधर’साठी भाजपकडून शेलार, दराडे, डावखरे यांना उमेदवारी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्रात येत्या २६ जून रोजी ४ पदवीधर व शिक्षक मतदारसंघात निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी आपले ३ उमेदवार जाहीर केले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना तर मुंबई विभाग पदवीधरमधून किरण शेलार आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली. यामध्ये मुंबई विभाग पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघ अशा एकूण ४ जागांसाठी २६ जून रोजी निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई विभाग पदवीधरमधून किरण शेलार आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर पक्ष मुख्यालयातून ही यादी जाहीर करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत आपल्या घटक पक्षांना सोबत घेऊन लढलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या विधानपरिषद निवडणुकीत मात्र, समन्वय बिघडला असल्याचे दिसून आले आहे. महायुतीला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीला मनसेची मनधरणी करावी लागणार आहे.
महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघातून शिवसेना नेते अनिल परब यांना आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतही तिढा निर्माण झाला आहे.