‘आयटीआय’ची आजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सोमवार (दि. 3) पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
दहावीच्या निकालानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया कधी होणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी मिळून 52 आयटीआयमधील सुमारे 6 हजारांहून अधिक प्रवेश जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन, फीटर, मॅकेनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडशनिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर, वेल्डर यासह महिलांसाठी कॉस्मॉटॉलॉजी, फूड अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, सुईंग टेक्नॉलॉजी आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा कल असतो. कोल्हापूर शासकीय आयटीआयमध्ये विविध 31 ट्रेडच्या सुमारे 1,340 जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती शासकीय आयटीआयचे प्राचार्य एम. एस. आवटे यांनी दिली. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती 3 ते 30 जून
प्रवेश अर्ज निश्चित करणे 5 जून ते 1 जुलै
पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करणे 5 जून ते 2 जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध 4 जुलै
गुणवत्ता यादीवर हरकती नोंदवणे 4 ते 5 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध 7 जुलै
पहिली प्रवेश फेरी 14 जुलै
दुसरी प्रवेश फेरी 15 ते 19 जुलै
तिसरी प्रवेश फेरी 28 जुलै ते 2 ऑगस्ट
संस्थास्तर समुपदेश फेरी 26 ऑगस्ट