वाशीममध्ये राममंदिराजवळील गोशाळेला आग

वाशीममध्ये राममंदिराजवळील गोशाळेला आग

वाशीम; Bharat Live News Media वृत्तसेवा : येथील पुरातन राम मंदीर परिसरात असलेल्या गोशाळेला रविवारी (दि.२) दुपारी अचानक आग लागली. या आगीत गाईंसाठी साठवलेला चारा भस्मसात झाला. नागरिकांच्या सतर्कतेने दाट वस्तीतील अनर्थ टळला.
येथील बालाजी मंदिराच्या मागे पुरातन राम मंदीर आहे. मंदीर परिसरात असलेल्या गोशाळेत वाळलेला चारा साठवून ठेवण्यात आला होता. दुपारी तीनच्या सुमारास या चाऱ्याला अचानक आग लागली. व काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. गोशाळेत गाई नसल्याने जिवीतहानी टळली, मात्र आगीत गाईंसाठी साठवलेला सगळा चारा जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी पाचारण केले. अग्नीशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर दोन तासांनी ही आग आटोक्यात आली. राममंदिर परिसर अतिशय दाट लोकवस्तीचा भाग आहे. आग लवकर आटोक्यात आली नसती, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.
हेही वाचा :

चंद्रपुरात १५ वर्षीय मुलाचा डबक्यात बुडून मृत्यू
सोलापूर : चारचाकी-दुचाकी गाडीच्या अपघातात तिघे ठार
धक्कादायक! गडचिरोलीत अंगणात झोपलेल्या व्यक्तीला पेट्रोल टाकून पेटवले