तहसीलदारांची फिल्मी स्टाईल कारवाई; पाठलाग करत पकडला अवैध वाळूचा ट्रक

तहसीलदारांची फिल्मी स्टाईल कारवाई; पाठलाग करत पकडला अवैध वाळूचा ट्रक

करमाळा, Bharat Live News Media वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरु होती. काही दिवसांपुर्वीच सोलापूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कुगाव, चिकलठाण, ढोकरी आदि ठिकाणी छापे मारून अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या माफियांना गजाआड केले.
दरम्यान करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी निवडणुकीच्या व्यस्त कामातून बाहेर येत पुन्हा कारवाई करून वाळू माफियांना चाप बसवला आहे. करमाळा तालुक्यामध्ये ढोकरी, चिकलठाण, कुगाव, खडकी, आळजापुर, बिटरगाव, घारगाव ,करंजे ,आवाटी आदी भागात वाळू माफियांनी पुन्हा जोर धरला होता. अहमदनगर जिल्ह्यातील जवळा तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वाळू माफिया अवैध वाळू काढून मलिदा लाटण्याचा व्यवसाय जोरात चालू केला होता.
या घटनेबाबत जातेगाव येथे अवैध वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती तहसीलदार ठोकडे यांना मिळाली होती. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी एकट्याच जावून जातेगाव येथे अवैध वाळू घेऊन चाललेला विना क्रमांकाचा ट्रक चालकासह रंगेहात पकडला. तसेच ट्रकमधील साडेतीन ब्रास वाळू जप्त केली. या छाप्यादरम्यान 2 लाख 87 हजार 325 रूपयाचा दंड घोडके नावाच्या चालकाला ठोठावला.
हेही वाचा :

लवकरच उद्धव ठाकरे मोदी सरकारमध्ये सामील होतील ‘या’ नेत्याचे मोठे विधान
पंतप्रधान मोदींनी घेतला ‘रेमल’ चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा 
Uttar Pradesh earthquake: उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के