डोंबिवलीतील सम्राट चौकात अपघात; डंपरच्या धडकेत महिला ठार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम डोंबिवलीतील सम्राट चौकात एका भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.2) दुपारच्या सुमारास घडली. स्नेहा सुधीर दाभिलकर (वय 52) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात दुचाकीस्वार पतीही जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपरसह चालकाला ताब्यात घेतले आहे. डोंबिवली पश्चिम …

डोंबिवलीतील सम्राट चौकात अपघात; डंपरच्या धडकेत महिला ठार

डोंबिवली; Bharat Live News Media वृत्तसेवा : पश्चिम डोंबिवलीतील सम्राट चौकात एका भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.2) दुपारच्या सुमारास घडली. स्नेहा सुधीर दाभिलकर (वय 52) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात दुचाकीस्वार पतीही जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपरसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
डोंबिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या स्नेहा पती सुधीर यांच्यासोबत दुचाकीवरून पासपोर्ट कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास तेथून परतत असताना सम्राट चौकात त्यांच्या दुचाकीला एम एच 05/एफ जे/4890 क्रमांकाच्या डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या स्नेहा गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात त्यांचे पती सुधीर हे देखील जखमी झाले आहेत. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या डंपरच्या चालकाला विष्णूनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर स्नेहा यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी शोकाकूल वातावरणात निर्माण झाले होते.
स्नेहा दाभिलकर यांच्या बळीला कारणीभूत कोण?
पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव-माणकोली या खाडीवरील उड्डाण पुलाला लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. मात्र तत्पूर्वीच या पुलाचा वापर सुरू करण्यात आला आहे. पुलामुळे या भागाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई-ठाणे अंतर जवळ झाल्यामुळे या पुलाच्या परिसरात टोलेजंग-बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत. या गृहनिर्माण प्रकल्पांना लागणाऱ्या कच्च्या-पक्क्या मालाची ने-आण करणाऱ्या मालवाहू ट्रक आणि डंपर्सची वर्दळ वाढली आहे. त्यांचे चालक रूंद-अरूंद रस्त्यांवर भरधाव वेगात ट्रक आणि डंपर्स चालवत असतात. या चालकांकडून कोणतेही नियम पाळले जात नाहीत. अशाच एका चालकाने स्नेहा दाभिलकर यांचा बळी घेतल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत.