आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
चिराग दारूवाला :
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यास आनंदित व्हाल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तणावातून आराम मिळेल. मुलांसाठी करिअर सल्ला घ्या. कोणत्याही बेकायदेशीर कामात स्वारस्य दाखवू नका, अन्यथा नुकसान होईल. मुलाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. सध्या त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहील. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा.
वृषभ : विद्यार्थी अभ्यास आणि करिअरकडे अधिक लक्ष देतील
श्रीगणेश म्हणतात की, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल, यातून तुम्हाला नवीन सकारात्मक ऊर्जा मिळेल. घरातील कामांबरोबरच वैयक्तिक कामांकडेही लक्ष द्या. तुमच्या निष्काळजीपणामुळे इतरांना त्रास होईल. विद्यार्थी अभ्यास आणि करिअरकडे अधिक लक्ष देतील. रोजगाराच्या शोधात असणार्यांना नोकरी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अतिकामामुळे डोकेदुखी आणि थकवा जाणवेल. स्वतःसाठी वेळ काढा.
मिथुन : अति विचारापेक्षा कृतीला प्राधान्य द्या
दैनंदिन कामापासून विश्रांती घेतल्यास ऊर्जा आणि ताजेपणा अनुभवायला मिळेल. ग्रहस्थिती चांगली आहे. या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या, असे श्रीगणेश सांगतात. जवळच्या नातेवाईकांसोबत तणाव राहील. तरुणांनी करिअरवर लक्ष केंद्रित करावे. यंत्रसामग्री आणि कारखान्याशी संबंधित कामात प्रगती होईल. अति विचारापेक्षा कृतीला प्राधान्य द्या. पैशांचा अपव्यय करु नका. वैवाहिक जीवन गोड होईल.
कर्क : सध्या ग्रहमान अनुकूल नाही
धार्मिक समारंभात सहभागी व्हाल. कोणाच्याही वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू नका. जमिनीचे काम तूर्तास स्थगित करा. सध्या ग्रहमान अनुकूल नाही. कठोर परिश्रम करा. अडचणीच्या प्रसंगी भाऊ किंवा जवळच्या मित्राचा सल्ला घ्या, नातेसंबंधात कुटुंबातील सदस्यांकडून परवानगी मिळाल्यास आनंदी व्हा. आहारावर नियंत्रण ठेवा.
सिंह: करिअर संदर्भात तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळेल
श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्हाला मित्राला आर्थिक मदत करावी लागेल. करिअर संदर्भात तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन करा. व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक व्यवहारात संयम राखावा. पती-पत्नीमध्ये काही वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात. हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता.
कन्या : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा
काही काळापासून रखडलेल्या कामांना आज गती मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल. वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल; पण मित्रांसोबत व्यर्थ वेळ घालवल्याने महत्त्वाची कामे थांबू शकतात. आपल्या कामांना प्राधान्य देणे योग्य ठरेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मानेच्या आणि खांद्याचे दुखण्याचा त्रास होवू शकतो. व्यायाम आणि योगावर अधिक लक्ष द्या.
तूळ : आज प्रत्येक संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या
श्रीगणेश म्हणतात की, आज प्रत्येक संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार योग्य परिणाम देखील मिळतील. काही अप्रिय घटनेमुळे मन उदास राहील. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. यावेळी कोणत्याही प्रकारचा प्रवास हानीकारक ठरू शकतो. कार्यक्षेत्रात काम करण्याचा उत्साह वाढेल; परंतु कोणतेही बेकायदेशीर काम करणे टाळा, अन्यथा मोठे नुकसान होवू शकते. कौटुंबिक जीवनात योग्य सुसंवाद राखण्याची गरज आहे. अल्पकालीन आरोग्य समस्या सुधारतील.
वृश्चिक : प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि कुटुंबाच्या मान्यतेने विवाह होईल
श्रीगणेश सांगतात की, दैनंदिन दिनचर्या व्यतिरिक्त काही वेळ आत्मनिरीक्षणात घालवा. यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक वाटेल. तरुणांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. महिलांना त्यांच्या व्यवसाय किंवा नोकरीबद्दल जागरुकता येईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमचे सहकारी आणि कर्मचारी यांच्याशी व्यवहार करताना संयम बाळगा.
प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि कुटुंबाच्या मान्यतेने विवाह होईल. आरोग्याच्या दृष्टीने वेळ फारसा अनुकूल नाही.
धनु: आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील
श्रीगणेश म्हणतात की, आज तुमचे स्वप्न साकारु शकेल. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा. घर आणि कुटुंबाच्या सुखसोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. अप्रिय व्यक्तीच्या घरी आगमन झाल्याने मनःस्थिती खराब होईल; पण यावेळी आपण सकारात्मक असायला हवे. इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. तरुण वर्गाला कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. घराची व्यवस्था योग्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस फारसा अनुकूल नाही. उपचारात निष्काळजीपणा दाखवू नका.
मकर : कामातील यश तुमचा थकवा दूर करेल
वक्तृत्वाने आणि कार्यशैलीने कोणतेही काम पूर्ण करू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. धावपळीमुळे थकवा जाणवेल, पण कामातील यश तुमचा थकवा दूर करेल. अहंकार नियंत्रणात ठेवा. त्यामुळे संबंध बिघडू शकतात. वेळेचे मूल्य ओळखा. घरातील ज्येष्ठांकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रात काही नवीन योजना राबवाल. भागीदारीच्या व्यवसायात जुने मतभेद दूर होतील. नोकरीत तुमचे ध्येय साध्य होईल. पती-पत्नीची एकमेकांबद्दल सहकार्याची वृत्ती असेल.
कुंभ : भावांसोबतचे संबंधही मधुर होतील.
आज मागील काही दिवस सुरु असणारी चिंता आणि तणाव दूर होईल. तुम्ही तुमची कामे शांततेने पूर्ण करू शकाल. भावांसोबतचे संबंधही मधुर होतील. भविष्यातील योजनांवर गांभीर्याने विचार करता येईल. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील प्रत्येक लहानसहान गोष्ट गांभीर्याने घ्या, अशी सूचना श्रीगणेश करतात. पती-पत्नी एकमेकांना समजून घेतील.
मीन : लाँग ड्राईव्हवर जाण्याचा बेत आखाल
तुमच्यासाठी काळ अनुकूल आहे. तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे पूर्ण फळ मिळेल. कोणतेही काम नियोजनपूर्वक करा, यश निश्चित आहे. तरुणांच्या करिअरशी संबंधित समस्या दूर होतील. संवाद साधताना काळजी घेणे आवश्यक आहे. अतिआत्मविश्वास हानीकारक ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. तांत्रिक क्षेत्रातील लोकांना अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. लाँग ड्राईव्हवर जाण्याचा बेत आखाल. आरोग्य चांगले राहील. तुम्हाला उत्साही वाटेल.