नागपूर : कळमना येथे आढळले पिता-पुत्राचे अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह

नागपूर : कळमना येथे आढळले पिता-पुत्राचे अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कळमना परिसरातील गुलमोहर नगरात एक खळबळजनक घटना घडली. शनिवारी (दि.1) एका बंद घरात पिता- पुत्राचे रक्तबंबाळ तसेच अर्धनग्न मृतदेह आढळून आले. शिवदास भेंडे (वय 79) आणि हरीश भेंडे (वय 39) दोघेही राहणार गुलमोहरनगर अशी या मृतकांची नावे आहेत. या घटनेमुळे पूर्व नागपूर भागात खळबळ उडाली आहे.
भेंडे यांच्या घरामधून उग्र वास येत होता. यानंतर शेजाऱ्यांनी भेंडेच्या भावाना फोन केला. त्यानंतर त्यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. थोड्या वेळात कळमना पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले.
शिवदास भेंडे यांना तीन अपत्य असून ती बाहेरच राहतात. हरीश आणि शिवदास हे दोघे या घरात एकत्र राहत होते. हरीश हा रागीट स्वभावाचा असल्याने त्याचे कोणासोबत पटत नव्हते. अशी माहिती परिसरात मिळाली.
शिवदास महानगरपालिकेचे सेवानिवृत्त निरीक्षक असून त्यांचा मृतदेह बाथरूमध्ये आणि मुलाचा रक्तबंबाळ मृतदेह सोफ्यावर होता. काही दिवसांपूर्वीची ही घटना घडली असावी दुर्गंधी येत असल्याने या घटनेचा उलगडा झाला. या पिता पुत्रांनी हा टोकाचा निर्णय का घेतला, की हा घातपाताचा प्रकार आहे. याविषयी पोलीस तपास करत आहेत. नातेवाईक, कुटुंबातील सदस्यांनी या घटनेचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट्स नंतरच या सर्व घटनेचा उलगडा होणार असल्याची माहिती कळमना पोलिसांनी दिली.
हेही वाचा :

इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होणार : विजय वडेट्टीवार
जळगाव -रावेर लोकसभा 14 टेबलवर मतमोजणी होणार, तयारी पूर्ण
Weather Update | ‘या’ राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता