Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा चित्रपट मिस्टर आँड मिसेस माही चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने आपली जादू चालवली आहे. बॉक्स ऑफिसवर मिस्टर अँड मिसेस माहीने सात कोटींची कमाई केली आहे. ओपनिंगला दमदार कमाई करत हा चित्रपट सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.या चित्रपटाने रिलीजच्या आधी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चांगलं कलेक्शन केलं होतं. आतापर्यंत चित्रपटाने ८.५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
अधिक वाचा-
कोल्हापूरशी आर माधवनचे ऋणानुबंध; आवडत्या मिसळीचा कट अन् बरंच काही…
काय आहे मिस्टर अँड मिसेसची कहाणी?
‘मिस्टर अँड मिसेस माही’ एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. क्रिकेटच्या प्रति राजकुमारची जिद्द आणि प्रेमासाठी मैदानात उतरलेली जान्हवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडलीय. महेंद्र असे राजकुमारच्या भूमिकेचे नाव असून बालपणापासून क्रिकेटर बनण्याचे स्वप्न असते. पण, तो आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. पण, महेंद्रचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिमा (जान्हवी) मैदानात उतरते. पेशाने डॉक्टर महिमा आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करायचं ठरवते.
अधिक वाचा-
मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच
मिस्टर अँड मिसेसमध्ये ‘या’ कलाकारांची चर्चा
चित्रपटामध्ये राजकुमार आणि जान्हवी शिवाय कुमुद मिश्रा, अभिषेक बॅनर्जी, जरीना वहाब आणि राजेश शर्मा यासारख्या दमदार कलाकारांनी काम केलं आहे. जान्हवी या चित्रपटामध्ये चौकार-षट्कार लावताना दिसत आहे. राजेश शर्माने त्याच्या क्रिकेट कोचची भूमिका चांगल्या पद्धतीने साकारली आहे. कुमुदने राजकुमारचे वडील आणि जरीना वहाबने आईची भूमिका साकारली आहे. याआधी जान्हवी आणि राजकुमार यांनी ‘रूही’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
अधिक वाचा-
‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट
राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या चित्रपटाने २०२४ मधील रिलीज ‘फायटर’, ‘बडे मिया छोटे मियां’सहित अनेक मोठ्या चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनचे रेकॉर्ड ब्रेक केले.
View this post on Instagram
A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)