मेगाब्लॉकमुळे आजच्या दोन परिक्षा पुढे ढकलल्या; मुंबई विद्यापीठाचा निर्णय
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे आजच्या (दि.१) दोन परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या कामासाठी ३० मे २०२४ मध्यरात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक घेतला जात आहे. मेगाब्लॉकमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यास गैरसोय होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने तांत्रिक कामासाठी 63 तासांचा विशेष जम्बो ब्लॉक जाहीर केला आहे. शुक्रवार (दि.३०) मध्यरात्रीपासून ठाणे स्थानकात तर सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड या दरम्यान मेगा ब्लॉक असेल. याचा फटका प्रवाशांना बसला आहे, दरम्यान विद्यार्थ्यांच्या परिक्षाही आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून आज (दि.१) होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. बीएमएस ( ५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र २ व अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ चा एक पेपर अशा दोन परिक्षा होत्या. दरम्यान या परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे विद्यापीठाने म्हटलं आहे.
हेही वाचा
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुधारणा करा!