आपली लोकशाही अधिक चैतन्यशील बनवूया : PM मोदींचे मतदारांना आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या अंतिम टप्‍प्‍यातील मतदान आज होत आहे. आठ राज्‍यांमधील ५७ मतदारसंघांमध्‍ये ही प्रक्रिया पार पडेल. मतदानाला प्रारंभ झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. (Lok Sabha Elections 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, २०२४ लोकसभा निवडणुकीचा …

आपली लोकशाही अधिक चैतन्यशील बनवूया : PM मोदींचे मतदारांना आवाहन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या अंतिम टप्‍प्‍यातील मतदान आज होत आहे. आठ राज्‍यांमधील ५७ मतदारसंघांमध्‍ये ही प्रक्रिया पार पडेल. मतदानाला प्रारंभ झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. (Lok Sabha Elections 2024)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, २०२४ लोकसभा निवडणुकीचा आज शेवटचा टप्‍पा आहे. मला आशा आहे की तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावतील. आपण मिळून आपली लोकशाही अधिक चैतन्यशील आणि सहभागी बनवूया.  (Lok Sabha Elections 2024)

Today is the final phase of the 2024 Lok Sabha elections. As 57 seats across 8 states and UTs go to the polls, calling upon the voters to turnout in large numbers and vote. I hope young and women voters exercise their franchise in record numbers. Together, let’s make our…
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2024

अखेरच्या टप्प्यात 57 जागांवर आज मतदान
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मतदान होऊ घातलेल्या ठिकाणी एक कोटी 9 लाख मतदान केंद्रे आहेत. तिथे 10 कोटी 9 लाख कर्मचार्‍यांना नेमण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यात 10 कोटी 6 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 5 कोटी 24 लाख पुरुष आणि 4 कोटी 28 लाख महिला मतदारांचा समावेश आहे.
अखेरच्या टप्प्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 13 जागांवर मतदान होत आहे. याशिवाय पश्चिम बंगाल 9, बिहार 8, ओडिशा 6, हिमाचल प्रदेश 4, झारखंड 3 व चंदीगडमधील एका जागेवर मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी निवडणूक निकाल लागणार आहे.
मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे लागणार आहेत. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच 3 केंद्रीय मंत्र्यांचे नशीब ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मोदी हे वाराणसी मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय चंदौली येथून, अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून आणि राज्यमंत्री पंकज चौधरी महाराजगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.  (Lok Sabha Elections 2024)
गेल्या लोकसभा निवडणुकीत या टप्प्यात भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील 9, बिहारमधील 5, हिमाचल प्रदेश 4, झारखंड, ओडिशा आणि पंजाबमधील प्रत्येकी दोन आणि चंदीगडच्या एका जागेचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील सर्वात जास्त 13 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा या सर्व जागा जातीय समीकरणात अडकल्या आहेत. कुशीनगर, देवरिया, सलेमपूर, बलिया, महाराजगंज आणि रॉबर्टस्गंज मतदारसंघात जातीच्या आधारावर मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.  (Lok Sabha Elections 2024)
बिहारमधील पाटलीपुत्र, आरा आणि बक्सरमध्येही जातीय समीकरणामुळे भाजपची वाट अवघड बनली आहे. आरा येथून केंद्रीय मंत्री आर. के. सिंह निवडणूक लढवत आहेत. पाटलीपुत्र येथून राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती नशीब आजमावत आहेत. मीसा भारती यांची भाजपचे खासदार रामकृपाल यादव यांच्याशी टक्कर आहे. पंजाबमध्ये गेल्यावेळी भाजपने अकाली दलासोबतच्या युतीत 2 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे.