‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी..

‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : प्रेम कहाणीसोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक आहे. तसेच रत्नागिरी सुपुत्र फैरोज माजगावकर ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून मराठी चित्रपट सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर चक्क ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित करण्यात आल. शिवाय ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाला ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळाला. हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. शिवाय अदिन माजगावकर आणि अली माजगावकर हे बालकलाकार देखील आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे आहेत. येत्या ७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होईल.”
अधिक वाचा-

‘पंचायत-३’च्या ‘या’ अभिनेत्याला ॲडल्ट चित्रपटांमध्ये करावं लागलं होतं काम

गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी, प्रस्तुतकर्ते एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे फैरोज अनवर माजगावकर, अमजद हुसैन निराळे, श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून अनिल वहाने आणि सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. साई पियुष, ऍलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे.
अधिक वाचा-

Tripti Sahu : ‘पंचायत ३’ फेम खुशबू भाभी आहे कोण?; खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस

‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’विषयी बातचीत करताना फैरोज माजगावकर म्हणाला, ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आपला मराठी चित्रपट आज न्यूयॉर्कपर्यंत पोहोचला आहे. माझ्यासाठी व सर्व मराठी चित्रपटसृष्टी करिता ही अभिमानाची गोष्ट आहे. मी याच सर्व श्रेय या चित्रपटाच्या टीमला देतो. तसेच प्रेक्षकांना विनंती करतो की सर्वांनी हा चित्रपट ७ जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहा.”

चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच माझ्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित झाले. ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर माझ्या चित्रपटाचे मोशन पोस्टर झळकले. त्यामुळे माझ्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे की हा चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करेल आणि लोकांच्या पसंतीस पडेल. ही अपेक्षा मी व्यक्त करतोय.
विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव जरी प्रेमावर आधारित असलं तरी यामागे दडलेलं भयानक कृत्य आहे ते तुम्हाला चित्रपटगृहातच पाहायला मिळेल. माझी रसिक प्रेक्षकांना एकच विनंती आहे की या चित्रपटातील टीजर आणि गाण्यांना तुम्ही जो प्रतिसाद दिलात तोच प्रतिसाद ७ जूनला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नक्की द्याल आणि आपला मराठी चित्रपट यशाच्या शिखरावर घेऊन जाल.”
अधिक वाचा-

अजय देवगन-तबूच्या ‘औरों में कहा दम था’ची तारीख रिलीज