पुणे पोर्शे अपघात: पोलिसांनी संशयिताच्या आईला केली अटक
पुणे : Bharat Live News Media ऑनलाईन पुणे पोर्श घटना प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन संशयित आरोपीच्या आईलाही अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली.
संशयित आरोपीच्या आईलाही ताब्यात घेतले
पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करत अल्पवयीन संशयित आरोपीच्या आईलाही ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिने आपल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात नुसती छेडछाडच केली नाही तर ते बदललेही. ही बातमी समोर येताच शिवानी भूमिगत झाली. अखेर पुणे पोलिसांनी तीला शोधून काढले आहे. काल रात्री ती मुंबईहून पुण्यात आली. अटकेची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाईल.
Pune car accident case | Mother of the minor accused arrested in the case: Pune Police Commissioner Amitesh Kumar
(File photo)#Maharashtra pic.twitter.com/9U64dsGGxv
— ANI (@ANI) June 1, 2024
आईने मुलाबदली आपल्या रक्ताचा नमुना दिला
वास्तविक, या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना त्याच्या आईच्या रक्ताच्या नमुन्याने बदलण्यात आला होता. मुलाच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी न देता आईने आपल्या रक्ताचा नमुना दिल्याच्या कारणाने आईला अटक करण्यात आली आहे. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, अल्पवयीन संशयीत आरोपीच्या रक्ताचा नमुना एका महिलेच्या रक्ताच्या नमुन्याने बदलण्यात आला होता.
हेही वाचा :
LPG Cylinder Price : महिन्याच्या सुरूवातीलाच आनंदवार्ता; LPG सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Lok Sabha Election 2024 : अखेरच्या टप्प्यात आठ राज्यांतील ५७ जागांसाठी मतदान सुरू
आयटी कंपन्यांच्या स्थलांतरास खोके सरकार जबाबदार : सुप्रिया सुळे