पंतप्रधान मोदींची दुसऱ्या दिवशही विवेकानंद शिलेवर ध्यानधारणा
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कन्याकुमारीत ४५ तासांच्या ध्यानधारणेला सुरुवात केली आहे. आज दुसऱ्या दिवशीही मोदी येथील विवेकानंद शिलेवर जिथे स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते तिथे ध्यान करत आहेत. शनिवारी १ जूनपर्यंत ते येथे ध्यान करणार आहेत.
#WATCH | Tamil Nadu | PM Narendra Modi meditates at the Vivekananda Rock Memorial in Kanniyakumari, where Swami Vivekananda did meditation. He will meditate here till 1st June. pic.twitter.com/cnx4zpGv5z
— ANI (@ANI) May 31, 2024
पंतप्रधान मोदी यांनी काल प्रारंभी कन्याकुमारीत पोहोचल्यानंतर भगवती देवी अम्मन मंदिरात (कन्याकुमारी मंदिर) दर्शन घेतले आणि पूजा केली होती. पंतप्रधानांच्या या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली असून, शनिवारपर्यंत पर्यटकांसाठी प्रवेशबंदीचे आदेश जारी केले गेले आहेत.
दरम्यान, मोदींची ध्यानधारणा टी. व्ही. वर दाखवली गेली तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ध्यान करण्याची खरी गरज ५ ते ७ वर्षांपूर्वीच होती, असे नमूद केले. मोदी जेथे ध्यानधारणा करणार आहेत, तेथे भारताची सीमा संपते. तेथून पुढे फक्त पाणीच पाणी आहे. उष्णता फार असल्याने मोदींना कदाचित अंटार्क्टिकाला जायचे असेल, असे ते पुढे म्हणाले.
Kanniyakumari, Tamil Nadu | PM Narendra Modi meditates at the Vivekananda Rock Memorial, where Swami Vivekananda did meditation.
PM Narendra Modi will meditate here till 1st June pic.twitter.com/kcPECWZetA
— ANI (@ANI) May 31, 2024