भुसावळ गोळीबारातील मृतांच्या शरीरातून काढल्या 11 गोळ्या

जळगाव पुढारी वृत्तसेवा-भुसावळ शहरात जुने सातारा जवळील मरी माता मंदिराच्या जवळ मुख्य रस्त्यावर काल रात्री (दि. 29)  गोळीबार झाला. त्यात माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा सहकारी सुनील राखुंडे या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी एका संशयितास भुसावळ येथे अटक केली आहे. तर, जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या शव विच्छेदनातून दोघांच्या शरीरातून 11 गोळ्या काढण्यात आल्याची …

भुसावळ गोळीबारातील मृतांच्या शरीरातून काढल्या 11 गोळ्या

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा-भुसावळ शहरात जुने सातारा जवळील मरी माता मंदिराच्या जवळ मुख्य रस्त्यावर काल रात्री (दि. 29)  गोळीबार झाला. त्यात माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा सहकारी सुनील राखुंडे या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी एका संशयितास भुसावळ येथे अटक केली आहे. तर, जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या शव विच्छेदनातून दोघांच्या शरीरातून 11 गोळ्या काढण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भुसावळ शहरामध्ये दि. 29 रोजी दुपारी पाण्याच्या टँकर वरून झालेल्या वादाच्या रागातून माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे हे दोघेही जळगाव नाक्याकडे जुना सातारा या भागात कारने येत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार मध्ये दोघेही जण जागीच ठार झाले होते. त्यांना शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले होते. दि. 30 रोजी त्यांचे शवविच्छेदन करून भुसावळ येथील त्यांच्या राहत्या घरी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते.
बारसेंना 3 राखुंडे यांना 8 गोळ्या
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक संतोष बारसे यांना तीन गोळ्या लागलेल्या होत्या तर सुनील राखुंडे यांना 8 गोळ्या लागलेल्या असल्याची माहिती विश्वस्त सूत्रांकडून मिळालेली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपीला भुसावळ येथून दुपारी अटक केलेली आहे.
हेही वाचा –

भाजपकडून आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन
Nashik Fraud News | कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगत १० लाखांचा गंडा