भाजपकडून आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

भाजपकडून आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

सेलू; Bharat Live News Media वृत्तसेवा : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडो मारो आंदोलन करण्यात आले. आज (दि.30) क्रांती चौकात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त मोठया संख्येने उपस्थित झाले होते.
महाड येथे आव्हाड यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले गेले. त्याचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्यावर राष्ट्रद्रोह व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात भाजप शहराध्यक्ष अशोक अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष माऊली ताठे, ॲड.संजय लोया,जिल्हा सरचिटणीस महामंत्री अर्जुन बोरुळ, युवा तालुका अध्यक्ष गणेश काटकर, युवा शहराध्यक्ष संदीप बोकन, महिला शहराध्यक्ष रुपाली ठाकूर, शिवाजी खेडकर, बबीता ठाकूर, विठ्ठल कोकर, गणेश गोरे, वाल्मीक खुळे,विश्वास राजवाडकर, कृष्णा चव्हाण, अमोल भोसले, प्रकाश शेरे, गोविंद शर्मा, दत्तराव मोगल, लक्ष्मण गायके, सरपंच नागेश ठाकूर, सिराज शेख, पराग गोळेगावकर, लालू खान पठाण, अभय महाजन, अल्ताफ खान पठाण, कृष्णा गायकवाड, सुधाकर काकडे, अरबाज खान, अशोक शेलार, प्रशांत ठाकूर, पप्पू शिंदे, ॲड.रामेश्वर शेवाळे, राजू सोळंके, संजय भाग्यवंत, नंदूशेठ पारिक, किरण सवलके, विवेक कुरनाळे सोनू चव्हाण विवेक पुरनाळे पप्पू कदम आदी सहभागी होते.