गोंदियात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन; भाजप कार्यकर्ते आक्रमक

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृति दहन करून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा आरोप करत जिल्हा भाजपकडून आज (दि. ३०) जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे महाड येथे मनुस्मृति दहन …

गोंदियात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन; भाजप कार्यकर्ते आक्रमक

गोंदिया; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृति दहन करून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा आरोप करत जिल्हा भाजपकडून आज (दि. ३०) जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे महाड येथे मनुस्मृति दहन आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनात आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अवमाना केल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला. तर गोंदिया शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित डोंगरे यांच्या नेतृत्वात जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करुन त्यांच्या फोटोला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आले.
यावेळी अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विश्वजीत डोंगरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, जिल्हा महामंत्री सुनील केलनका, गोंदिया ग्रामीण अध्यक्ष धनलाल ठाकरे, शहराध्यक्ष अमित झा, शंभूशरणसिंह ठाकूर, नरेंद्र तुरकर, राकेश अग्रवाल, जयंत शुक्ला, किशोर मेश्राम, गुड्डू चांदवानी, बाबुलाल पंचभाई, धर्मिष्ठा सेंगर, पुरू ठाकरे, धनंजय रिनायत आदी उपस्थित होते.