शुभ वार्ता! मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात दाखल
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : गुरुवारी दुपारच्या सुमारास मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात एकाच दिवशी दाखल झाला आहे.यंदा तो दोन्ही ठिकाणी वेळेआधीच पोहोचला आहे. यंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने 15 मे रोडीच दिला होता. अल निनो ची स्थिती संपून ला-निना सक्रीय झाल्यामुळे मान्सून वारे अंदामानात 19 मे रोजी धडकले.
त्यानंतर 24 मे रोजी रेमल चक्रीवादळ आले त्यामुळे मान्सूनला गती मिळाली. दरवर्षी मान्सून केरळ मध्ये 1 जून रोजी येतो तर ईशान्य भारतात चार पाच दिवसांच्या अंतराने दाखल होतो. मात्र यंदा तो केरळ मध्ये नियोजित तारखेपेक्षा दोन दिवस आधीच म्हणजे 30 मे रोजी तर ईशान्य भारतातही एकाच दिवशी दाखल झाल्याने तो संपूर्ण देशात वेगाने प्रवास करेल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा
T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपपूर्वी ICC चा मोठा निर्णय, ‘या’ संघाच्या जर्सीवर घातली बंदी
घनकचरा व्यवस्थापन करात दुप्पट वाढ : करवाढ रद्द करा; शिवसेनेची मागणी
Nashik News | पिंपळगाव येथील तरुणाचा विहीरीजवळ पाय घसरला आणि जीवाला मुकला