MLC निवडणूक विभाग : मतदार नोंदणीसाठी १४१० अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस शुक्रवार पासून (दि.३१) प्रारंभ होत आहे. मतदारसंघात यंदा इच्छूकांची संख्या अधिक असल्याने निवडणूक रंगतदार होईल, असा अंदाज आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातून पुरवणी मतदार यादीत नावनोंदणी साठी १ हजार ४१० शिक्षकांनी निवडणूक विभागाकडे अर्ज केले आहे. लोकसभेचा धुराळा बसतो न बसतो तोच नाशिक …

MLC निवडणूक विभाग : मतदार नोंदणीसाठी १४१० अर्ज

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस शुक्रवार पासून (दि.३१) प्रारंभ होत आहे. मतदारसंघात यंदा इच्छूकांची संख्या अधिक असल्याने निवडणूक रंगतदार होईल, असा अंदाज आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातून पुरवणी मतदार यादीत नावनोंदणी साठी १ हजार ४१० शिक्षकांनी निवडणूक विभागाकडे अर्ज केले आहे.
लोकसभेचा धुराळा बसतो न बसतो तोच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा बिगूल वाजला. नाशिक, नगर, धूळे, जळगाव व नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असलेल्या शिक्षक मतदारसंघात उमेदवारीसाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळते आहे. महायुती व महाआघाडी सोबत विविध शिक्षक संघटनांकडून अनेक इच्छूक मैदानात ऊतरण्यासाठी तयारी करत आहेत. निवडणूकीची अधिसूचना शुक्रवारी (दि.३१) जाहिर होणार असून त्या क्षणापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ जून असणार आहे. १० जुन रोजी छाननी, १२ ला माघारी व २६ तारखेला मतदान होणार आहे.
विभागाची शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी ३० डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. विभागातील पाचही जिल्हे मिळून ६४ हजार ८०८ शिक्षक मतदारांची नोंदणी पूर्ण झाली. त्यानंतर पुरवणी मतदार यादीकरीता अर्ज मागविण्यात आले. त्याम‌ध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यातून १ हजार ४१० शिक्षकांनी मतदार यादीत नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. दाखल अर्जाची छाननीचे काम सध्या निवडणूक शाखेकडून केले जात आहे.
३० डिसेंबरची अंतिम यादी

जिल्हा मतदार
नाशिक 23,597
नगर 14,648
जळगाव 13,056
धुळे 8088
नंदुरबार 5419
एकूण 64, 808

हेही वाचा:

सोने तस्करीप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पीएला अटक
‘गाभ’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर