जळगाव : रामदेववाडी रन अँड हिट प्रकरणी नातेवाईकाचे पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह
जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणातील तीन आरोपींना सोमवारी (दि.२७) न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाबद्दल फिर्यादी नातेवाईक राजेश चव्हाण यांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. गरिबांसाठी न्याय व पाठिंबा देणारे कोणीच नसतात, असा माध्यमांशी बोलताना त्यांनी उल्लेख केला. याप्रकरणी योग्य तो न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
रामदेववाडी येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील चार जणांचा बळी गेला होता. या प्रकरणातील संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अपघातातील मृत महिलेचे भाऊ फिर्यादी राजेश चव्हाण यांनी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी होती, मात्र तसे होताना दिसत नाही, असे ते यावेळी म्हणाले. तसेच पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने जात असल्याचा आरोप करत आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा :
जळगाव : रन अँड हिट प्रकरणी तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
‘कलेक्टर’ पोलिसांना मुख्यालयाचा रस्ता : जिल्हा पोलिस दलात फेरबदलाचे संकेत
सिंहगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यात पर्यटक जखमी; मोठी दुर्घटना टळली