दिल्ली नवजात बालक मृत्यूप्रकरण: रूग्णालयाच्या संचालकांना पोलीस कोठडी
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा- दिल्लीतील बेबी केअर सेंटरला शनिवारी (दि.२५ मे) रोजी आग लागून ७ नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत अटकेत असलेल्या २ संचालकांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणातील आरोपी संचालक डॉ. नवीन खिची, डॉ. आकाश यांना करकरडूमा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यानंतर न्यायालयाने दोघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या बेबी केअर सेंटरला पाच खाटांचाच परवाना होता. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन करून त्यांनी १२ नवजात बालके रुग्णालयात दाखल होती. यासोबतच परवान्याची मुदतही संपली होती, दरम्यान अटकेतील दोन्ही संचालकांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या कबुलीनंतर न्यायलयाने त्यांची तीन दिवसांसाठी कोठडीत रवानगी केली आहे.
हेही वाचा :
मालीवाल मारहाण प्रकरण : बिभव कुमार यांना तीस हजारी न्यायालयाचा झटका, जामीन अर्ज फेटाळला
Delhi Fire Tragedy : दिल्ली बेबी केअर सेंटर दुर्घटना; रुग्णालयाच्या मालकाला अटक
दिल्लीत बेबी केअर सेंटरला भीषण आग; ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, ५ रूग्णालयात दाखल