आरसीबीच्या पदरी पुन्हा निराशा; राजस्थानचा 4 विकेटनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामन्यात राजस्थानने बंगळुरूचा 4 विकेट राखून पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा चार गडी राखून पराभव केला. यामुळे बेंगळुरूचा सलग सहा सामने जिंकण्याचा प्रवासही संपला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 8 …

आरसीबीच्या पदरी पुन्हा निराशा; राजस्थानचा 4 विकेटनी विजय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामन्यात राजस्थानने बंगळुरूचा 4 विकेट राखून पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.
आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा चार गडी राखून पराभव केला. यामुळे बेंगळुरूचा सलग सहा सामने जिंकण्याचा प्रवासही संपला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 19 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले.
तत्पूर्वी, सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुूरूने 8 फलंदाज गमावून 172 धावा केल्या. यामध्ये रजत पाटीदारने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. पाटीसोबत विराट कोहली (33), लोमरोर (32) आणि कॅमरून ग्रीन (27) यांनी निर्णायक खेळी केली. तर, गोलंदाजीमध्ये राजस्थानच्या आवेश खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याच्यासह अश्विनने 2 तर, चहल, बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.,
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला राम राम?
24 मे रोजी दुसऱ्या बाद फेरीत त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ 26 मे रोजी अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सशी खेळेल. बंगळुरूच्या खेळाडूंनी दिनेश कार्तिकला ज्या प्रकारे मिठी मारली, त्यावरून असे मानले जात आहे की कार्तिकचाही हा आयपीएलमधील शेवटचा सामना होता. कार्तिकने यापूर्वी सीएसकेला पराभूत केल्यानंतर सांगितले होते की, सीएसकेविरुद्धचा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा असेल असे त्याला वाटत होते. अशा स्थितीत कार्तिकची कारकीर्द संपल्याचे मानले जात आहे.
(बातमी अपडेट होत आहे)