भाजपला मत म्हणजे विकसित भारताचा संकल्प : पंतप्रधान मोदी

भाजपला मत म्हणजे विकसित भारताचा संकल्प : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपला मिळालेले प्रत्येक मत विकसित भारताचा संकल्प निश्चित करणार असल्याचे सांगून देशात पुन्हा भाजप-एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.२३) व्यक्त केला.
दिल्लीतील द्वारका येथील प्रचारसभेत पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेसने ६० वर्षात ७० विमानतळ बनवले तर आमच्या सरकारने १० वर्षात ७० नवीन विमानतळ बांधले आहेत. काँग्रेसने ६० वर्षात ३८० वैद्यकीय महाविद्यालये तर आम्ही ३२५ पेक्षा जास्त नवीन वैद्यकीय महाविद्यालये निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस सरकारमधील विविध योजना भ्रष्टाचारासाठी होत्या. आम आदमी पक्षाने दिल्लीत मद्य धोरण घोटाळा केल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.
हेही वाचा :

दिल्लीतील जनता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवेल : नितीन गडकरी
देशात गरीब, श्रीमंतांना वेगळा न्याय का? पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणी राहुल गांधींचा सवाल
हकालपट्टीच्या पत्रावर गजानन किर्तीकरांचे उत्तर; आयुष्य आहे तोपर्यंत पक्षाला…