Bharat Live News Media ऑनालईन डेस्क : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी’ बेवसीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊन अवघ्घे दोनच आठवडे झाले आहेत. दरम्यान या वेबसारीजमधील सर्व पात्रे आणि त्याच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केलं जात आहे. ‘हिरामंडी’ बेवसीरीजमध्ये ‘बिब्बो जान’ ची भूमिका खूपच गाजली. ही भूमिका बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने उत्तमरित्या साकारली आहे. एकिकडे तिच्या या बेवसीरीजमधील ‘गजगामिनी वॉक’ जोरदार चर्चा होत आहे. तर दुसरीकडे तिच्या पर्सनल लाईफचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
अभिनेत्री आदिती राव हैदरी विषयी ‘हे’ माहित आहे काय?
आदितीने २००६ मध्ये श्रींगारम या तमिळ चित्रपटामधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.
आदितीने ‘हिरामंडी’ बेवसीरीजमध्ये ‘बिब्बो जान’ ची भूमिका साकारलीय.
आदितीने २००९ मध्ये ‘देल्ही-६’ यामधून बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केलं
आदिती २०१३ मध्ये ‘मर्डर ३’ या चित्रपटात सारा लॉरेनसोबत झळकली.
‘गजगामिनी वॉक’ चा व्हिडिओ व्हायरल
अदिती राव हैदरीचा ‘हिरमंडी’ बेवसीरीजमधील ‘गजगामिनी वॉक’चा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अदिती एक वेगळ्याच मूडमध्ये चालताना दिसत आहे. याविषयी आदितीने एका मुलाखतीत सांगितले आहे की, ”यावेळच्या डान्समधील चालण्याचा प्रकार मला माहित नव्हता. मला कथ्थकमधील मयूर चाल (मोराची चाल) मला माहित आहे. पंरतु, मला गजगामिनी चाल हे मला माहीत नाही. संजय सरांनी मला करायला लावले तसे मी केले. ‘गजगामिनी वॉक’ला नेमकं काय म्हणतात? हे त्यावेळी माहित नव्हतं.” यासोबत अदितीने संजय लीला भन्साळी यांनी तिचे अभिनयासोबत वजन वाढल्याने कौतुक केल्याचे सांगितले आहे.
अदिती राव हैदरीच्या पर्सनल लाईफची चर्चा
अदितीच्या अभिनयासोबत तिच्या पर्सनल लाईफबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत अदितीला बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत दुसरं लग्न कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना आदिती पहिल्यांदा लाजली आणि म्हणाली की, ”जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा लग्न करणार आहे?. ही गोष्ट तुम्हाच्यापासून थोडीच लपून राहणार आहे.” यासोबत तिने सिद्धार्थचे खूपच कौतुक केलं आहे.
”सिद्धार्थ एक आर्टिस्ट आहे. यासोबत तो एक समजूतदार व्यक्ती आहे. तो प्रत्येक काम मनापासून करतोय. तो नेहमी चित्रपटाच्या दुनियेत असतो. तो कधी-कधी मजेदार आणि रोमॉन्टिक होतो”. असेही ती म्हणाली. याचदरम्यान अदितीने सिद्धार्थसोबत गुपचूप साखरपुढा उरकला होता याविषयावर म्हणाली की, ”या कार्यक्रमात माझ्यासोबत सर्वजण खूपच खूश होते. यावेळी संपूर्ण परिवार एकत्र होता.”
अदिती राव हैदरी राजघराण्याची संबंधित आहे. तिचा जन्म हैदराबादच्या शादी खानदानात झाला आहे. अदितीचा पणजोबा अकबर हैदरी १८६९ ते १९४१ या काळात हैदराबाद संस्थानचे प्रधानमंत्री होते. नाना रामेश्वर राव हे वानापथी राज्याचे राजा होते. अदिती आणि सिद्धार्थ दोघांचे पहिले लग्न मोडले आहे. आदितीचे पहिलं लग्न सत्यदीप मिश्रासोबत झाले होते मात्र, काही कारणास्तव दोघांचा घटस्फोट झाला. तर सिद्धार्थचे पण पहिले लग्न मोडले आहे.
हेही वाचा
तू मला मिळालीस धन्य झालो…; कुशालने पोस्ट करत रिलेशन केलं कंन्फर्म
Aditi Rao Hydari-Siddharth : लग्न नव्हे…अदिती राव हैदरी-सिद्धार्थच्या साखरपुड्याचा फोटो समोर
Aditi Rao Hydari : आदितीचा सिद्धार्थसोबतच्या रिलेशनशीपचा खुलासा, ‘बिझी शेड्युल…’
View this post on Instagram
A post shared by Netflix India (@netflix_in)