चंद्रपूर आणि गडचिरोलीत पाच दिवसाचा यलो अलर्ट, अवकाळीची शक्यता

चंद्रपूर आणि गडचिरोलीत पाच दिवसाचा यलो अलर्ट, अवकाळीची शक्यता

चंद्रपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: जून महिना संपायला अवघे दहा दिवस बाकी असतानाही अवकाळी पाऊस विदर्भातून जायला तयार नाही.
दर दिवशीच हवामान खाते येलो ऑरेंज अलर्ट घोषित करून नागरिकांना अलर्ट करीत आहे. हवामान खात्याने आज रविवारी (दि.१९) पुन्हा पाच दिवसाचा यलो अलर्ट (Weather forecast) घोषित केला आहे. यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे.

 विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात नागपूर, वर्धा भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी तीन दिवसाचा यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.   यंदाचा संपूर्ण उन्हाळा अवकाळी पावसात जात आहे. वादळी वारा गारपीटीसह अवकाळीचे आगमन होऊन शेतकरी त्रस्त झाला आहे.  दर दिवशी हवामान खात्याचा इशारा येत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षीचा संपूर्ण उन्हाळाच अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला आहे .त्यामुळे कधी पावसाळा तर कधी उन्हाळ्याचा अनुभव नागरिकांना घेत आहे. परंतु अवकाळी पावसात (Weather forecast) शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेला आहे.

सध्या विदर्भातील चंद्रपूर भंडारा वर्धा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी उन्हाळी धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. काही ठिकाणी फळबागा,  भाजीपाला चे उत्पन्न घेतली जात आहे परंतु अवकाळी पावसात  वादळीवाऱ्यासह पाऊस येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दिवसागणिक हवामान खात्याचा अंदाज बदलत आहे. आज 19 मे ला हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज रविवारपासून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात 23 मे पर्यंत पाच दिवसाचा तर   नागपूर, वर्धा, भंडारा गोंदिया येथे पुढचे दोन दिवस आज आणि उद्या वगळता 23 मे पर्यंत तीन दिवसाचा यलो अलर्ट चा (Weather forecast) इशारा दिला आहे.

आठदिवसांवर येवून ठेपलेल्या जून महिन्यामध्ये हवामान खात्याने दिलेल्या इशारा नुसार पावसाला पडायला सुरूवात होईल. यावर्षीचा पावसाळा गेल्यापासून  मे मार्च,एप्रिल, मे तिन्ही महिन्यात अवकाळी पडत आहे. दिवसाआड अवकाळी पाऊस कुठे ना कुठे कोसळत असल्यामुळे त्याचा परिणाम शेतपिकावर झाला आहे. सध्या पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात उन्हाळी धनाची लागवड करण्यात आलेली आहे.

काही ठिकाणी हार्वेस्टर व्दारे धानाची मळणी झालेली आहे. परंतु काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे धान कापणी मध्ये अडचण अडथळे येत आहे. अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह येत असल्यामुळे धान पडलेले आहेत. त्यामुळे धानाचे प्रचंड नुकसान होत आहे. दरदिवशी हवामान खाते अवकाळीचा इशारा देत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस पडला तर शेतकऱ्यांना धान कापणी करताना मोठी नुकसान सहन करावी लागू शकते.