राजगडमधून सिम्बॉल लोडिंग युनिट गायब; दिग्विजय सिंहांची सुप्रीम कोर्टात धाव

राजगडमधून सिम्बॉल लोडिंग युनिट गायब; दिग्विजय सिंहांची सुप्रीम कोर्टात धाव

ताजेश काळे

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी मध्यप्रदेशातील राजगड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात वापरण्यात आलेले “सिम्बॉल लोडिंग युनिट” स्ट्रॉंग रूममधून गायब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाने “सिम्बॉल लोडिंग युनिट” दुसरीकडे हलविल्याचे चौकशीत आढळल्यामुळे दिग्विजय सिंग यांनी गुरूवारी (दि.१६) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर उद्या शुक्रवारी (दि.१७) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मतदान संपल्यानंतर राजगड प्रशासनाने “सिम्बॉल लोडिंग युनिट” (एसएलयू ) राजगडमध्ये सुरक्षित ठेवण्याऐवजी गुना येथील स्ट्रॉंग रूममध्ये हलविण्यात आले असल्याचा आरोप दिग्विजयसिंह यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एसएलयू ४५ दिवसांपर्यंत स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. मात्र, तरीही राजगडमधील एसएलयू शेजारच्या गुना मतदारसंघात हलविण्याचा मुद्दा समोर आला आहे.
दिग्विजयसिंह यांच्या मतदारसंघातील एसएलयू गायब होण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे मध्यप्रदेशातील प्रवक्ते विवेक त्रिपाठी यांनीही केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून यामागे कोणाचा हात आहे, याची माहिती समोर आणावी, अशी मागणी त्रिपाठी यांनी केली आहे.
हेही वाचा :

केजरीवाल यांना जामीन देताना विशेष सवलत दिलेली नाही : सुप्रीम कोर्ट
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कोल्हापुरात अंबाबाईच्या चरणी (Video)
Dhule Lok Sabha | मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करा : मुख्य निवडणूक अधिकारी