कोहली घेणार निवृत्ती, म्हणाला ‘तुम्ही मला पाहू शकणार नाही..’ (Video)

कोहली घेणार निवृत्ती, म्हणाला ‘तुम्ही मला पाहू शकणार नाही..’ (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Virat Kohli On Retirement : ‘जेव्हा माझा क्रिकेटचा प्रवास संपेल तेव्हा मी निघून जाईन’, असे धक्कादायक विधान टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने केले आहे. आरसीबीच्या रॉयल गाला डिनर कार्यक्रमात केलेल्या त्याच्या वक्तव्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या अधिकृत एक्स अकौंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या हंगामात त्याने आरसीबीसाठी धावांचा पाऊस पाडला आहे. 600 हून अधिक धावा फटकवणारा हा खेळाडू सर्वाधिक धावा करणा-या खेळाडूंच्या यादीत तो टॉपवर आहे. असे असतानाही कोहलीने अचानक निवृत्तीबाबत मोठे विधान का केले? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
विराट म्हणाला की, ‘मला वाटते की एक खेळाडू असल्याने माझ्या कारकिर्दीची एक शेवटची तारीख निश्चितच आहे. त्या खास दिवसानंतर पुढे काय होईल हा विचार करून मी माझे करिअर संपवू इच्छित नाही. माझ्या खेळातली गती कमी जास्त होईल. त्यामुळे मला कोणतेही काम अपूर्ण सोडायचे नाही, ज्याचा मला नंतर पश्चाताप होऊ शकतो. मी असे करणारही नाही याची मला पूर्ण खात्री आहे.’

“I wanna give it everything I have till the time I play, and that’s the only thing that keeps me going” 🤌
Virat’s emotional but promising words while talking at the @qatarairways Royal Gala Dinner. 🗣️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/htDczGQpNf
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 15, 2024