पूर्णा पंचायत समितीत ग्रामरोजगार सेवकांना टैबचे वाटप

पूर्णा पंचायत समितीत ग्रामरोजगार सेवकांना टैबचे वाटप

पूर्णा,Bharat Live News Media वृत्तसेवा: येथील पंचायत समिती कार्यालयात १४ मे रोजी तालुक्यातील ग्रामीण स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतील विविध कामे करण्यासाठी नियुक्त ग्रामरोजगार सेवकांना गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांच्याहस्ते टैब संचाचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोहयोचे तांत्रिक साहय्यक अरुण राठोड, साहय्यक कार्यक्रम अधिकारी किरण बनसोडे, गिरीष शिंदे, संतोष कदम, महिंद्र बावीस्कर, भुजबळ, आवरगंडसह आदी. कर्मचारी उपस्थित होते. सदरील टैबचे वाटप हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना नियोजन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या वतीने तालुक्यातील ६५ ग्रामरोजगार सेवकांना सुपूर्द करण्यात आले.
या टैबमुळे ग्रामरोजगार सेवकांना आपापल्या ग्राम स्तरावर चालू असलेल्या मातोश्री पांदन शेत रस्ते, सिंचन विहरी, विविध फळबाग, वृक्ष लागवड, प्रधानमंत्री आवास घरकूल, रमाई घरकूल, फूलशेती लागवड, पशूधन शेत गोठे या बरोबरच नरेगा योजनेअंतर्गतच्या कामांसाठी मदत होणार आहे. यामध्ये नियुक्त केलेल्या मजूरांची डिमांड देणे, मजुराचे जाबकार्ड काढणे, बॅंकेचे बचतखाते लिंक करणे, जिओ टैगिंग करणे, मजूराचे कामावरील मस्टर काढणे, इत्यादी कामे टैबवर करता येणार आहेत.
या पूर्वी हि कामे ग्रामरोजगार सेवकांना पंचायत समितीतील रोजगार हमी कक्षात दररोज ये-जा करुन करावी लागत होती. आता तो हेलपाटा मारणे टळल्या जाणार असून, रोजगार हमी योजनेची सर्वच कामे टैबवर आनलाइन होणार आहेत. सदर टैब वाटप करण्यात आल्यामुळे संपूर्ण ग्रामरोजगार सेवकाकडून शासनासहच कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांनी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करुन उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांचे आभार मानले जात आहेत.