राम नदी ‘मैली’! बिल्डरकडूनच सोडले जातेय सांडपाणी; ‘आप’चा आरोप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बावधन खुर्द येथील एका सोसायटीतून दररोज 10 ते 12 टँकर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट राम नदीत सोडले जाते. या सोसायटीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंद पडला असून, बांधकाम व्यावसायिकाकडूनच हे पाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप करीत हे न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाने (आप) दिला दिला. ‘आप’चे …

राम नदी ‘मैली’! बिल्डरकडूनच सोडले जातेय सांडपाणी; ‘आप’चा आरोप

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : बावधन खुर्द येथील एका सोसायटीतून दररोज 10 ते 12 टँकर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट राम नदीत सोडले जाते. या सोसायटीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंद पडला असून, बांधकाम व्यावसायिकाकडूनच हे पाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप करीत हे न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाने (आप) दिला दिला. ‘आप’चे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पर्यावरण सेलचे कुणाल घारे, किरण कद्रे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
राम नदीच्या प्रदूषणासंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) सुनावणी सुरू आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याविरोधात हा दावा दाखल आहे. राम नदी परिसरात झालेल्या मोठ्या गृहप्रकल्पांत निर्माण होणारे सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारीवर ही सुनावणी सुरू आहे. राम नदी पूर्ववत करावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.
एकीकडे ही सुनावणी सुरू असतानाच शहरातील एका प्रथितयश बांधकाम व्यावसायिकाने बावधन येथे बांधलेल्या गृहप्रकल्पात निर्माण होणारे मैलामिश्रित सांडपाणी राम नदीत सोडले जात असल्याचे आढळून आल्याचा दावा घारे यांनी केला. ते म्हणाले, राम नदीत सोडल्या जाणार्‍या पाण्यासंदर्भात कोणीच जबाबदारी घेत नाही. गेल्या चार वर्षांपासून या सोसायटीमधील सांडपाणी नदीत सोडले जात आहे. हा प्रकार गंभीर आहे. महापालिका राबवत असलेल्या जायका प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा

बँकांनी अडवली ऊसतोडणी यंत्रे; अनुदानापासून वंचित राहण्याचा धोका
जळगाव : सहा हजाराच्या लाचप्रकरणी ग्रामसेवकासह शिपाई अटकेत
काँग्रेस सत्तेत आल्यास देशाचे विभाजन : पंतप्रधान मोदी