शेअर बाजाराची दमदार सुरुवात, सेन्सेक्स-निफ्टी वधारला

शेअर बाजाराची दमदार सुरुवात, सेन्सेक्स-निफ्टी वधारला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातील तेजीचे सकारात्‍मक पडसाद देशांतर्गत बाजारात उमटले. आज व्‍यवहाराच्‍या सुरुवात जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स 300 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह उघडला.
आयटी क्षेत्रातील शेअर्संनी बाजरातील सुरुवातीच्‍या व्‍यवहारांना उत्‍साहवर्धक सुरुवात करुन दिली. विप्रो, इन्फोसिस एलटीआय माइंडट्री हे आघाडीवर होते. भारती एअरटेल आजही टॉप गेनर्सपैकी एक आहेत. व्यवहाराच्या सुरूवातीस, सेन्सेक्स सुमारे 330 अंकांच्या वाढीसह 73,300 च्या वर उघडला. निफ्टी 95 अंकांच्या वाढीसह 22,300 च्या आसपास तर निफ्टी बँक 245 अंकांच्या वाढीसह 47,932 च्या आसपास उघडला.
टेक महिंद्रा, भारती एअरटेल, LTIMindtree, Infosys आणि ONGC हे निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक वाढले होते. तर मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड कॉर्प, टाटा मोटर्स, श्रीराम फायनान्स आणि Divi’s Lab हे निफ्टी 50 मध्ये प्रमुख पिछाडीवर होते.