परभणी : पिंपळा भत्या येथे एक लाखांची बैलजोडी चोरीला

पूर्णा,पुढारी वृत्तसेवा : पिंपळा भत्या येथे शेतातून बैलजोडी चोरल्याची भलतीच घटना समोर आली आहे. नागोराव मोरे या शेतकऱ्याच्या गट क्रमांक 186 मधील शेतामध्ये बांधलेली 1 लाख रुपये किंमतीची बैलजोडी चोरांनी पळवून नेली. काळा रंग असलेला 50 हजार रुपये किंमतीचा एक बैल, तर तांबडा मोरा रंगाचा बैल किंमत 50 हजार रुपये असे दोन बैल अज्ञात चोरट्यांनी …

परभणी : पिंपळा भत्या येथे एक लाखांची बैलजोडी चोरीला

पूर्णा,Bharat Live News Media वृत्तसेवा : पिंपळा भत्या येथे शेतातून बैलजोडी चोरल्याची भलतीच घटना समोर आली आहे. नागोराव मोरे या शेतकऱ्याच्या गट क्रमांक 186 मधील शेतामध्ये बांधलेली 1 लाख रुपये किंमतीची बैलजोडी चोरांनी पळवून नेली.
काळा रंग असलेला 50 हजार रुपये किंमतीचा एक बैल, तर तांबडा मोरा रंगाचा बैल किंमत 50 हजार रुपये असे दोन बैल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना उघडकीस चुडावा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोह राठोड करीत आहेत.
हेही वाचा :

चंदगड : जंगमहट्टीत जमिनीच्या वादातून महिलेस मारहाण
परभणी: रुंज येथे जिवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग
परभणी: जिंतूर येथे पैशाच्या वादातून चुलत भावाचा खून; दोघांना अटक