गर्भवतींना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान परवानगीबाबत विचार करा : उच्च न्यायालय
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गर्भवती महिलांना पोस्टाद्वारे मतदान करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करा, अशी सूचना नुकतील तेलंगणा उच्च न्यायालयाने नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. या प्रकरणी दाखल जनहित याचिका तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धीरज सिंह ठाकूर आणि न्यायमूर्ती आर रघुनंदन राव यांनी निकाली काढल्याचे वृत्त ‘बार अँड बेंच’ने दिले आहे.
काय होती याचिकाकर्त्याची मागणी?
१९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ६० नुसार पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यास पात्र म्हणून कोणत्याही वर्गाला सूचित करण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणार्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. तशीच तरतूद केंद्रीय निवडणूक आयोगाने गर्भवती महिलांसाठी करावी. त्यांनाही पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची परवानगी देण्यात यावी.याबाबत अधिसूचना जारी करावी, शी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.
Consider allowing pregnant women to vote through postal ballot: Telangana High Court to ECI
Read story here: https://t.co/xaKBkb1K5j pic.twitter.com/OqcIHmFVAx
— Bar and Bench (@barandbench) May 15, 2024
संबंधित याचिका ही एक प्रतिनिधित्व म्हणून पाहावी
या याचिकेवर तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धीरज सिंह ठाकूर आणि न्यायमूर्ती आर रघुनंदन राव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. संबंधित याचिका ही एक प्रतिनिधित्व म्हणून पाहावी. गर्भवती महिलांना पोस्टाद्वारे मतदान करण्याची परवानगी देण्याबाबत निवडणूक आयोगाने विचार करावा, अशी सूचना देत खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.
‘भविष्यातील निवडणुकांसाठी निवडणूक आयोग विचार करेल”
सुनावणीवेळी निवडणूक आयोगाच्या वकिलांनी स्पष्ट केले की, “सध्या देशभरात लोकसभा निवडणुका सुरु आहेत. याचिकाकर्त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर भविष्यातील निवडणुकांसाठी निवडणूक आयोग यावर विचार करेल.”
हेही वाचा :
‘न्यूजक्लिक’ संस्थापकांची अटक अवैध, तत्काळ सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
‘स्वीटी’ किंवा ‘बेबी’ म्हणणे नेहमीच लैंगिक टिप्पणी ठरत नाही : कोलकाता उच्च न्यायालय
हेमंत सोरेन यांना दणका,’पीएमएलए’ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला