मोठी बातमी! महादेव अँप प्रकरणी नारायणगावला छापा

मोठी बातमी! महादेव अँप प्रकरणी नारायणगावला छापा

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : नारायणगाव येथे पुणे -नाशिक महामार्गालगत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका इमारतीत महादेव ऍप द्वारे बेकायदेशीर रित्या ऑनलाईन जुगार सुरु होता.या बाबतची माहिती समजल्यानंतर आज (ता 15) पहाटेच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सुमारास तेथे छापा टाकला. या ठिकाणी सुमारे 100 मुले महादेव अँपच्या माद्यमातून ऑनलाईन सट्टा बुकिंग करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने या सगळ्यांची चौकशी सुरु आहे.
दरम्यान घटना स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज दुपारी भेट दिली. त्यांना या बाबत भ्रमणध्वनी वरून विचारले असता ते म्हणाले कि, चौकशी सुरु असून गुन्हा दाखल केल्यावर सविस्तर माहिती देण्यात येईल.
दरम्यान घटनास्थळी पोलीस बंदोबस्त अधिक प्रमाणात ठेवण्यात आला असून गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व अधिकारी आणि जुन्नर विभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर उपस्थित आहेत.
हेही वाचा

जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : युगेंद्र पवार
पळसदेवला वादळी वार्‍याने 8 बगळ्यांचा मृत्यू, 12 जखमी
सोलापूर : मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू