Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा सहा गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने मालिकाही २-१ ने जिंकली आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने विराट कोहलीचा T-20 मध्ये ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे.
काय हाेता विक्रम?
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर हाेता.
बाबरने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकूण 39 वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
या यादीत भारताचा कर्णधार राेहित शर्मा तिसर्या स्थानी आहे.
बाबर आझमने झळकावले T20 मधील 36 वे अर्धशतक
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात बाबरने अर्धशतक झळकावत विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला. त्याने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 36 वे अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले. बाबरने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकूण 39 वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विराटने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 37 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. त्याने ३९ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. बाबरने विराटला मागे सोडले. या यादीत रोहित शर्मा 34 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करत तिसऱ्या स्थानावर आहे.
Pakistan win the final T20I by six wickets @babarazam258 and @iMRizwanPak boss the chase with a stellar batting display #IREvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/Kcf6x09peF
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 14, 2024
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 50+ ची सर्वोच्च धावसंख्या
खेळाडू शतके अर्धशतके एकूण 50+ स्कोअर
बाबर आझम 3 36 39
विराट कोहली 1 37 38
रोहित शर्मा 5 29 34
मोहम्मद रिझवान 1 28 29
डेव्हिड वॉर्नर 1 26 27
बाबर-रिझवानची विक्रमी भागीदारी
बाबर आणि रिझवानने 139 धावांची भागीदारी केली. या दोघांमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3095 धावांची भागीदारी झाली आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भागीदारीत 3000 पेक्षा जास्त धावा करणारी ही जगातील पहिली जोडी आहे. याशिवाय बाबर आणि रिजवान यांच्यात टी-20 इंटरनॅशनलमध्ये 10 वेळा शतकी भागीदारी झाली आहे. असे करणारी ही पहिली जोडी आहे. याशिवाय अन्य कोणत्याही जोडीने पाच शतकांपेक्षा जास्त भागीदारी केलेली नाही.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावांची भागीदारी
फलंदाज देश धावा
1 ) बाबर आझम, मोहम्मद रिझवान पाकिस्तान ३०९५
2 ) अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग आयर्लंड 2043
3 )केएल राहुल, रोहित शर्मा भारत 1897
4 )शिखर धवन, रोहित शर्मा भारत १७४३
5)केविन ओब्रायन, पॉल स्टर्लिंग आयर्लंड 1720
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 100+ धावांची भागीदारी
फलंदाज देश किती वेळा?
1 ) बाबर आझम, मोहम्मद रिझवान पाकिस्तान १०
2 )केएल राहुल, रोहित शर्मा भारत ५
3 )शिखर धवन, रोहित शर्मा भारत ४
4 )आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आयर्लंड ४
5)मार्टिन गुप्टिल, केन विल्यमसन न्यूझीलंड ४
हेही वाचा :
Pakistan Cricket Team : T-20 वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तान संघात मोठे फेरबदल, ‘मॅच फिक्सर’चे पुनरागमन
U-19 Cricket WC Final : भारताचा पुन्हा ‘हार्टब्रेक’; अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ‘चॅम्पियन’
T20 World Cup : टीम इंडियाचे टी-20 वर्ल्डकपसाठी दोन बॅचमध्ये उड्डाण, हिटमॅन-बुमराह-पंड्या पहिला जाणार