फेसबुक-इन्स्टाग्राम पुन्हा ठप्प, जगभरातील युजर्स चिंतेत

फेसबुक-इन्स्टाग्राम पुन्हा ठप्प, जगभरातील युजर्स चिंतेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: फेसबुक आणि इंस्टाग्राम पुन्हा एकदा डाऊन झाले आहेत. जगभरातील युजर्स या दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकत नाहीत. दरम्यान १८ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त (Facebook, Instagram down) झाल्याचे वृत्त देखील ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्राम सारखे लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्स डाऊन झाल्याने अनेक युजर्स चिंतेत आहेत. डाउन डिटेक्टरच्या म्हणण्यानुसार, फेसबुकच्या शेकडो युजर्संनी आज (दि.१५) या ॲप्समध्ये प्रवेश करताना समस्या नोंदवल्या. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्षणीय व्यत्यय आले, युजर्संना पृष्ठे लोड करण्यात आणि अॅप्समधील वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यात मोठ्या प्रमाणात समस्या आल्याचे तक्रारीतून स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप मेटाकडून कोणतेही अधिकृत खुलासा (Facebook, Instagram down) करण्यात आलेले नाही.
दुसरीकडे, इंस्टाग्राम युजर्संना त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना समस्या (Facebook, Instagram down) येत होत्या. 600 अहवालांपैकी, 66 टक्के वापरकर्त्यांना ॲप-संबंधित समस्या होत्या आणि 26 टक्के युजर्संना Instagram च्या वेब आवृत्तीमध्ये प्रवेश करता आला नाही, असे देखील डाउन डिटेक्टरने म्हटले आहे.

Facebook and Instagram experiencing major issues, leaving thousands of users worldwide frustrated. DownDetector, a website that tracks outages, reported thousands of issues with Meta platform Instagram at approximately 2.30am UK time today.#instagramdown pic.twitter.com/pLz62L9dGz
— World Times (@WorldTimesWT) May 15, 2024

Facebook आणि Instagram मध्ये प्रवेश करण्यात समस्या
मेटा अंतर्गत येणारे फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा एकदा ठप्प झाले आहेत. 59 टक्के युजर्संना ॲपद्वारे प्रवेश करण्यात अडचणी येत आहेत. 34 टक्के युजर्संना प्रवेश करताना सर्व्हर कनेक्शन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचवेळी 7 टक्के युजर्संना लॉग इन करण्यात अडचणी येत आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की बुधवारी (दि.१५) सकाळी ७ वाजल्यापासून फेसबुक ऍक्सेस करण्याची समस्या येत आहे. या काळात, जागतिक स्तरावर, युजर्संची खाती स्वयंचलितपणे लॉग आउट होत आहेत.
हेही वाचा:

फेसबुकवरील जाहिरातीला भुलला आणि दुचाकी खरेदी पडली महागात..
Instagram Down : सोशल मीडिया पूर्ववत; फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप डाऊन झाल्याने युजर्सना मोठा फटका
Mark Zuckerberg : ‘फेसबुक’चे संस्थापक झुकेरबर्ग बांधत आहेत ‘सिक्रेट होम’!