तरुणीला बळजबरीने पाजली बिअर.. आणि नंतर घाणेरडे कृत्य; व्यावसायिकाला अटक
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : केअर टेकर तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्केट यार्ड भागातील एका बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली. प्रवीण बंब (वय 45, रा. लालबाग सोसायटी, गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 24 वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एप्रिल ते 11 मे या कालावधीत हा घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी लहान असताना एका अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. तरुणीचे मामा तिचा सांभाळ करतात. एका ब्युरोमार्फत ती बंब याच्या घरी केअर टेकर म्हणून काम करते.
बंबची आई आजारी आहे. तिच्या शुश्रूषेसाठी त्याने तरुणीला कामावर ठेवले होते. ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर घरात अत्याचार केले, तसेच खडकवासला येथील एका लॉजवर नेऊन तिला धमकावले. तिला बळजबरीने बिअर पाजून बलात्कार केला. तेव्हा या घटनेची माहिती कोणाला दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, सतत होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून तरुणीने हा प्रकार मामाला सांगितला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी बंबला अटक केली आहे. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. बंब बांधकाम व्यावसायिक असून, तो शेअर दलाल म्हणून काम करतो. सहायक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर तपास करीत आहेत.
हेही वाचा
‘आयसर पुणे’ 162 व्या स्थानी : यंग युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर
‘तो’ पीआर स्टंट नसून अब्दू खरोखरच करतोय लग्न!
कोट्यवधी रुपयांची संपत्ती केली नोकराच्या नावे!