राजस्थानमध्ये ५७७ मी. खोल खाणीत अडकलेल्या १४ जणांची सुटका

राजस्थानमध्ये ५७७ मी. खोल खाणीत अडकलेल्या १४ जणांची सुटका

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या (Rajasthan) झुंझुनू जिल्ह्यातील हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीत मंगळवारी रात्री लिफ्ट कोसळल्याने कोलकाता दक्षता पथकाच्या सदस्यांसह अडकलेल्या १४ जणांना वाचवण्यात यश आले आहे. खाणीत ५७७ मीटर खोलवर रात्रभर बचाव कार्य सुरू होते. आज सकाळी प्रथम तीन लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यानंतर उर्वरित ११ लोकांना बाहेर काढण्यात आले.
तांब्याच्या खाणीत लिफ्ट कोसळली वाचा ठळक मुद्दे

हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीत मंगळवारी रात्री लिफ्ट कोसळली होती
कोलिहान खाणीत ५७७ मीटर खोल अडकलेल्या १४ जणांची सुटका झाली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी १४ जणांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना दिल्या. 
१४ अधिकाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी जयपूरला नेण्यात आले आहे.

मंगळवारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दक्षता पथक खाणीत तपासणीसाठी गेले असता ही घटना घडली होती. अधिकारी वर येत असताना लिफ्टची साखळी तुटली. यामुळे दक्षता पथकासह १४ कर्मचारी खाणीत अडकले होते. त्यानंतर बचावकार्य सुरू होते. आज सकाळी सर्वांची सुटका झाली.

#WATCH | Rajasthan | Jhunjhunu’s Kolihan mine lift collapse: Nursing Staff of Jhunjhunu Government Hospital, Shishram says “Some people have suffered fractures in hands and some in legs. Everyone is safe. Three people are seriously injured, the rest are safe. The rescue operation… pic.twitter.com/GugXMoxvac
— ANI (@ANI) May 15, 2024

तिघांची प्रकृती गंभीर
यातील तिघांना प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जयपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. झुंझुनू सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर प्रवीण शर्मा यांनी सांगितले की, “खाणीत अडकलेल्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना जयपूरला रेफर करण्यात आले आहे.” रुग्णालयाचे कर्मचारी शिश्राम यांनी सांगितले की, “काही लोकांच्या हाताला तर काहींच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. सर्वजण सुरक्षित आहेत. तीन जण गंभीर जखमी आहेत, बाकीचे सुखरूप आहेत. बचावकार्याला यश आले आहे.”
मदतकार्य करण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना
खेत्री, झुंझुनू येथील हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीमध्ये लिफ्टची दोरी तुटल्याने झालेल्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बचाव कार्य आणि बाधित लोकांना सर्व मदत आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या होत्या.

Rajasthan CM Bhajanlal Sharma tweets, “Information was received about an accident caused by breakage of the lift rope in the Kolihan mine of Hindustan Copper Limited in Khetri, Jhunjhunu. The concerned officials have been instructed to immediately reach the spot and speed up the… pic.twitter.com/mh3Owe1TqT
— ANI (@ANI) May 15, 2024

हेही वाचा : 

राजीव गांधींची हत्या करणाऱ्या संघटनेवरील बंदी केंद्र सरकारने पाच वर्षांनी वाढवली
तिहार तुरुंगाला बॉम्बने उडवण्याची धमकी, प्रशासनाने दिली माहिती