गडचिरोली : तेंदूपाने तोडायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

गडचिरोली : तेंदूपाने तोडायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

गडचिरोली ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना गडचिरोली तालुक्यातील सावरगावच्या जंगलात आज (मंगळवार) सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली. पार्वताबाई बालाजी पाल (वय ६५) रा. आंबेशिवणी ता. गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, पार्वताबाई ही तीन महिलांसमवेत आंबेशिवणीपासून चार किलोमीटर अंतरावरील सावरगावच्या जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेली होती. तेंदूपाने तोडण्यात व्यस्त असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने पार्वताबाईवर हल्ला करून तिला जंगलात फरफटत नेले. हे दृश्य बघून शेजारच्या महिलांनी आरडाओरड केली. त्यानंतर जंगलात तेंदूपाने गोळा करणारे नागरिक गोळा झाले. तोपर्यंत वाघ घटनास्थळावरून पसार झाला. काही वेळाने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे तेंदूपाने तोडायला जाणारे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा : 

Delhi Bomb Threat : दिल्लीतील चार रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी 
Lok Sabha Election 2024 | महायुतीच्या प्रचार गीतात मनोज जरांगेंची छबी, मराठा आरक्षण दिल्याचा उल्लेख

Narendra Modi: ‘आई गंगाने मला दत्तक घेतलंय’, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पीएम मोदी भावूक