नाशिकमध्ये घंटागाडीवर आदळून वृद्धेचा मृत्यू
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- पादचारी वृद्धा घंटागाडीवर आदळून तिचा मृत्यू झाल्याची घटना धामणकर कॉर्नर परिसरात घडली. नलिनी प्रकाश सातपुते (७२, रा. मखमलाबाद राेड) असे या वृद्धेचे नाव आहे. सोमवारी ( दि. १३ ) सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नलिनी सातपुते या सकाळी दहाच्या सुमारास काकतकर हॉस्पिटलजवळील एका इमारतीबाहेर आल्या. तेथून पायी जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या घंटागाडीच्या मागील बाजूस ट्रॉलीवर तोल जाऊन त्या धडकल्या. त्या बेशुद्ध पडल्याने त्यांना औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णायालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी नलिनी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा –
Jalgaon Crime | गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवून १६ लाखांचा ऐवज लांबविला !
Jalgaon | Raver Lok Sabha : 38 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद, इतके झाले मतदान