Hoarding Collapse: घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : घाटकोपरमधील पंतनगर येथील पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळ्याची घटना सोमवारी (दि.१३) सायंकाळी घडली. या दुर्घटनेत शेकडो लोक पेट्रोलपंपाखाली अडकले. ज्यात ६० हून अधिक लोक जखमी झाले तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.
दुर्घटनेतून आतापर्यंत ६० हून अधिक नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून यातील ८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घनेतील गंभीर जखमींवर राजावाडी हॉस्पिटल व एचबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दुर्घटनेत जीव गमावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.१३) दिली.
हेही वाचा :
Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिग दुर्घटना; फडणवीस यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
Mumbai Hoarding Collapse : मुंबईला वादळी वा-याचा तडाखा, होर्डिंगसह पार्किंग लिफ्ट कोसळून मोठा अपघात
Nashik Crime News | लुटारुंना नागरिकांनीच पाठलाग करुन पकडलं, पोलिसांच्या केलं स्वाधीन