गावठी कट्टा, चाकूचा धाक दाखवून १६ लाखांचा ऐवज लांबविला

गावठी कट्टा, चाकूचा धाक दाखवून १६ लाखांचा ऐवज लांबविला

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा – चाळीसगाव तालुक्यातील दहीवद गावात अज्ञात ७ दरोडेखोरांनी घराच्या मागच्या खिडकीचे गज कापून आत शिरुन गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवून १६ लाख ७६ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना १२ मे रोजी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील दहीवद गावात घनश्याम धर्मराज पाटील वय २९ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १२ मे रोजी रात्री झोपलेले असतांना मध्यरात्री २.३० वाजता अज्ञात सात दरोडेखोर हे तोंडाला कापड लावून घराच्या मागच्या खिडकीचे गज कापून आत शिरले. त्यानंतर त्यांनी घनश्याम पाटील या तरूणाला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरातील १६ लाख ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकुण १६ लाख ७६ हजारांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.
हेही वाचा –

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिग दुर्घटना; फडणवीस यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
बेळगाव: चिकोडी लोकसभेसाठी जोरदार बेटिंग; काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी