Jalgaon | Raver Lok Sabha : 38 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद

Jalgaon | Raver Lok Sabha : 38 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघात सकाळी सात वाजेपासून मोठ्या उत्साहाने मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडत होते.  जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे मात्र मतदारांमध्ये रोष दिसून आला. येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. दिवसभरामध्ये 5 वाजेपर्यंत जळगाव लोकसभेत 51.98 व रावेर लोकसभेमध्ये 55. 36 टक्के मतदान झाले आहे. जळगाव लोकसभेमध्ये 14, रावेर लोकसभेमध्ये 24 असे 38 उमेदवारांचे ईव्हीएम मशीन मध्ये भविष्य बंद झाले.
रामदेववाडीत शून्य टक्के मतदान
जळगाव जिल्ह्याच्या रावेर लोकसभा मतदानासाठी सकाळपासून रांगा लागत होत्या. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान होत असताना जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी या  गावातील बुथ क्रमांक ३०७ वरील 1283 मतदारांनी बहिष्कार टाकलेला होता. कार व स्कूटर यामध्ये झालेल्या अपघातात आई व त्यांच्या मुलांसह भाच्याचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणातील आरोपींना अटक होत नाही, त्यांना शिक्षा होत नाही. तोपर्यंत मतदान करणार नाही असा पवित्रा मतदारांनी घेतला होता. यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, डी वाय एस पी गावित, आरडीसी सोपान कासार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी गावात भेट देऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र शेवटपर्यंत ते आपल्या मागण्यावर अडून राहिल्याने मतदान शून्य टक्के झाले.
रावेरची सकाळपासून आघाडी
सकाळी सात ते नऊ या वेळेस रावेर लोकसभेत 7.14 टक्के तर जळगाव लोकसभेत 6.14 टक्के मतदान झाले होते . यानंतर सात ते अकरा या वेळेस रावेर लोकसभेत 19.3 जळगाव लोकसभेत मध्ये 16.84 टक्के मतदान झाले. रावेर मतदार संघाने सकाळपासून मतदान मध्ये आघाडी घेतली होती.
दुपारी 5 वाजेपर्यंत रावेर लोकसभेमध्ये 55.36 जळगाव लोकसभेत 51.98 टक्के मतदान झालेले आहे. यामध्ये जळगाव लोकसभेतील विधानसभा क्षेत्र अमळनेर 41.70, चाळीसगाव 50. 37, एरंडोल ५५.१४, जळगाव सिटी 49.50 जळगाव ग्रामीण 55.79, पाचोरा 53.90 टक्के मतदान झालेले आहेत. रावेर लोकसभेमध्ये भुसावळ 52.70, चोपडा 55.91, जामनेर 54.63, मलकापूर 59.10, मुक्ताईनगर 53.20, रावेर 56.85% मतदान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळात जळगाव लोकसभेमध्ये दहा टक्के तर रावेर लोकसभेमध्ये जवळपास 11 टक्के मतदान झाले. त्यामुळे शेवटच्या एका तासामध्ये मतदानाचा टक्का पाच ते सात टक्क्यांनी दोन्ही मतदारसंघात वाढू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव लोकसभेचे 56.12 टक्के तर रावेर लोकसभेचे 61.40 टक्के मतदान झाले होते यावर्षी 2024 मध्ये रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभेत मतदारसंघांमध्ये जवळपास सारखी किंवा त्यापेक्षा एक ते दोन टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर विविध संकल्पनेतून मतदान केंद्र सजवण्यात आली होती. तसेच लहान मुलांना मतदार घेऊन येत असताना त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका व बालवाडी मतदान केंद्रांवर उभारण्यात आले होते. त्यामुळे मतदार रांगेत उभा असताना ती मुले त्या ठिकाणी खेळत होती.
जिल्ह्यामध्ये मॉक पोल अगोदर मॉक पोल नंतर जळगाव व रावेर लोकसभेत बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व्ही व्ही पॅड बदलाविण्यात आलेले आहेत.
जळगांव मॉक पोल अगोदर- मॉक पोल नंतर
बॅलेट युनिट 12. 16
कंट्रोल युनिट. 7. 8
व्ही व्ही पॅड 22. 18
रावेर लोकसभा
बॅलेट युनिट 9. 0
कंट्रोल युनिट. 8. 0
व्ही व्ही पॅड 17. 10
हेही वाचा –

बेळगाव: चिकोडी लोकसभेसाठी जोरदार बेटिंग; काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
Amit Shah Dhule Sabha |…म्हणून राहुल, उद्धव राम मंदिराच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले; अमित शहांचा घणाघात