अनिल भाईदास पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नामदार अनिल भाईदास पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क अमळनेर शहरात बजावला आहे. अनिल भाईदास पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यावेळी अतिशय अटीतटीची ही लढत ठरली होती. याशिवाय अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून पाठींबा देणारे असल्याने खान्देशातील राजकारणात त्यांनी एक चांगलं …

अनिल भाईदास पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नामदार अनिल भाईदास पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क अमळनेर शहरात बजावला आहे.
अनिल भाईदास पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यावेळी अतिशय अटीतटीची ही लढत ठरली होती. याशिवाय अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून पाठींबा देणारे असल्याने खान्देशातील राजकारणात त्यांनी एक चांगलं स्थान मिळवलेले आहे. त्यांच्या अमळनेर मतदारसंघात त्यांचा मोठा चाहता वर्ग असून त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाटील समाजाने चांगला प्रतिसाद दिला होता.  विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर अनिल भाईदास पाटील हे नाव संपूर्ण खान्देशात पोहोचलेले होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.