भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावला
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
जळगाव लोकसभेच्या भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यामध्ये अगदी आनंदाने लोकशाही उत्सव साजरा करत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यातील डांगर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळीच मतदान करत आपला हक्क बजावला आहे. प्रत्येक मतदाराने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आणि मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन स्मिता वाघ यांनी यावेळी केले आहे. यावेळी त्यांची कन्या भैरवी वाघ पलांडे आणि ईशा वाघ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
सकाळी 9 पर्यंत याप्रमाणे मतदारांनी मतदान केले आहे.
जळगावमध्ये सकाळी 9 पर्यंत 6.14 टक्के मतदान
नंदुरबारमध्ये सकाळी 9 पर्यंत 8.43 टक्के मतदान
रावेरमध्ये सकाळी 9 पर्यंत 7.14 टक्के मतदान