टी-शर्टमधील ‘टी’चा अर्थ काय?

पॅरिस : आपण बहुतांशी रोज आठवड्यातून काही दिवस तरी टी-शर्ट परिधान करतोच करतो. काहींचा तर टी-शर्टशिवाय दिवसच संपत नाही. आता टी-शर्टमधील शर्ट हा शब्द आपल्या सर्वांच्या पूर्ण परिचयाचा आहे. मात्र, यात टीचा अर्थ काय आहे, हे टी-शर्ट नित्यनेमाने परिधान करणार्‍या जवळपास 99 टक्के लोकांना ज्ञात असत नाही. एक खरे की, भारतात काळानुसार पेहरावही बदलत गेला …

टी-शर्टमधील ‘टी’चा अर्थ काय?

पॅरिस : आपण बहुतांशी रोज आठवड्यातून काही दिवस तरी टी-शर्ट परिधान करतोच करतो. काहींचा तर टी-शर्टशिवाय दिवसच संपत नाही. आता टी-शर्टमधील शर्ट हा शब्द आपल्या सर्वांच्या पूर्ण परिचयाचा आहे. मात्र, यात टीचा अर्थ काय आहे, हे टी-शर्ट नित्यनेमाने परिधान करणार्‍या जवळपास 99 टक्के लोकांना ज्ञात असत नाही.
एक खरे की, भारतात काळानुसार पेहरावही बदलत गेला आहे. पूर्वी लोक धोती-कुर्ता, कुर्ता-पायजमा घालायचे. आता कुर्त्याची जागा शर्ट, टी-शर्टने घेतली आहे. लहान मुले असो वा मोठी माणसे, पुरुष असो वा महिला, जवळपास सर्वच जण टी-शर्ट घालतात. अगदी 100 रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत टी-शर्ट मिळतात. वेगवेगळ्या रंगात, आकारात असे टी-शर्ट उपलब्ध असतात. अतिशय साधे पण आरामदायी, अशी टी-शर्टची संकल्पना. पण, या टी-शर्टमधील टीचा अर्थ काय, याचा आपण क्वचितच विचार केला असेल.
टी-शर्टमधील टीचे दोन अर्थ आहेत. सामान्यपणे टी-शर्टला कॉलर नसते. त्यामुळे त्याचा आकार इंग्रजी अक्षर टीसारखा दिसतो. म्हणून तो टी-शर्ट. दुसरे म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या सरावावेळी सैनिक ट्रेनिंगमध्ये असे हलके कपडे घालायचे, ज्याला ट्रेनिंग शर्ट म्हटले जायचे. याला शॉर्टमध्ये टी-शर्ट म्हणायचे आणि हेच टी-शर्टमधील ‘टी’चे ढोबळ मानाने दोन अर्थ आहेत.