वेलींपासून बनवलेला पूल!

वेलींपासून बनवलेला पूल!

शिकोकू : जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, अनेक सोयी-सुविधा असलेले पूल आहेत. मात्र, असाही एक पूल आहे, जो खूप जुना आणि फक्त वेलींपासून बनला आहे. जपानमधील शिकोकू बेटावरील इया व्हॅली खूप प्रसिद्ध आहे. तेथे हा पूल वसलेला आहे.
अतिशय निसर्गसुंदर अशा ठिकाणी आल्यावर हिरवळ जाणवते. इया व्हॅलीमधील सामुराई फार वर्षांपूर्वी नाहीशी झाली. त्यांच्या जागी आता दुकाने आणि पर्यटन स्थळ झाली आहेत. व्हॅलीच्या काही भागांत नदी जाते आणि तेथे पूलही आहे. तो संपूर्ण वेलींनी बनलेला आहे. विणलेल्या वेलींपासून बनलेला हा पूल लोकांना तात्पुरते फिरण्यासाठी मदत होईल म्हणून बनवला आहे. आश्चर्य म्हणजे 800 वर्षांपूर्वीपासून हा पूल आजही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
या पुलाचे 45 मीटर बांधकाम आहे. पुलापर्यंत चालत गेल्यावर बहुतेक लोक वेलींनी बनलेल्या रेलिंगला लटकलेले दिसतात. आठव्या शतकातील हा पूल सहज लोकांना नदीत फेकू शकतो. गेल्या 800 वर्षांत पुलाची रचना अनेकदा बदलली असल्याचेही म्हटले जाते. आता त्यावर उभे राहण्यासाठी स्टीलच्या तारांचा आधार देण्यात आला आहे. जेणेकरून पर्यटकांना आता तो ओलांडून पाहता येईल.
वेलींच्या पुलाच्या खाली 14 मीटरवर वाहणारी नदी दिसते. हा पूल क्रॉस करताना मनमोहक दृश्याचा आनंद मात्र घेता येत नाही. याचे कारण पुलावरून जात असताना सर्व लक्ष आपल्या पावलांकडेच द्यावे लागते. चुकीच्या ठिकाणी एखादे पाऊल पडले तरी खाली पडण्याचा धोका असतो.